महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक! प्रेमसंबंधात अडथळा, मुलीनेच केला जन्मदात्याचा खून - girl murdered her father

सातारा येथे एका मुलीनेच आपल्या जन्मदात्या पित्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधात अडथळा येत असल्याच्या कारणातून प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.

murder
हत्या

By

Published : Jan 24, 2020, 9:46 AM IST

सातारा - जिल्ह्यातील आकले येथे एका मुलीनेच आपल्या जन्मदात्या पित्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधात अडथळा येत असल्याच्या कारणातून प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा... पनवेलचा घरजावई निघाला बांगलादेशी, इनामुल मुल्लाचा 'असा' झाला मनोहर पवार

जन्मदात्या बापाचाच खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी काही तासातच या प्रकरणाचा छडा लावत, प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले. हे दोघेही आरोपी अल्पवयीन आहेत.

हेही वाचा... तांत्रिक बिघाड! गाझियाबादमध्ये चक्क रस्त्यावर उतरवले विमान..

मृत व्यक्ती 45 वर्षाची आहे. मोलमजुरी करून ते कुटुंबाचे पालन पोषण करत होते. त्यांची पत्नी गेल्या पंधरा वर्षांपासून बेपत्ता असून मुली व मुलासमवेत ते घरात राहत होते. मुलगा घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेला होता. बुधवारी मोलमजुरी करून ते मध्यरात्री घरी आले आणि झोपी गेले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर अवघ्या तीन तासातच या खुनाचा उलगडा झाला.

हेही वाचा... ...म्हणून मनसेने झेंडा बदलला, राज ठाकरेंचा खुलासा

या मुलीचे तेथील वस्तीतीलच एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे हा मुलगा वारंवार घरी येत होता. ही बाब मुलीच्या वडिलांना खटकत होती. त्यातूनच मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बुधवारी पित्याचा खून केला. रात्री 2 च्या सुमारास मुलीने स्वतःच्या काकांना वडील झोपेतून उठत नसल्याचे सांगितले. नातेवाईकांना घटना शंकास्पद वाटल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details