महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Girl Killed with Stab Knife : चाकूने भोकसून अल्पवयीन मुलीची हत्या, मारेकऱ्यानेही केले विषारी द्रव प्राशन - एकतर्फी प्रेमातून

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने चाकूने भोकसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला ( Girl Killed with Stab Knife ) आहे. संशयित निखिल राजेंद्र कुंभार (वय 26 वर्षे, रा. पिंपोडे बुद्रुक) हा कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. तो स्वतःही विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

खूनी
खूनी

By

Published : Mar 6, 2022, 8:23 PM IST

सातारा - कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने चाकूने भोकसून अल्पवयीन मुलीची हत्या केली ( Girl Killed with Stab Knife ) आहे. संशयित निखिल राजेंद्र कुंभार (वय 26 वर्षे, रा. पिंपोडे बुद्रुक) हा कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. तो स्वतःही तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपोडे बुद्रुक येथील बसस्थानक परिसरात पेट्रोल पंपाजवळ एक खासगी क्लास आहे. संबंधित विद्यार्थिनी इयत्ता 11 वी वाणिज्य शाखेत शिकत होती. नेहमीप्रमाणे सकाळी ती क्लाससाठी आली होती. क्लास साडेनऊ वाजता सुरू होणार होता. त्यामुळे वर्गात शिक्षक उपस्थित नव्हते. दरम्यान, या परिसरात दबा धरून बसलेला संशयित निखिल हा तत्पूर्वीच क्लासमध्ये आला होता. त्याच्या हातात चाकू होता. काही समजण्यापूर्वीच त्याने विद्यार्थिनीच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. या प्रकाराने क्लासमध्ये खळबळ उडाली. मुलीला जखमी अवस्थेत शेजारील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी तिचा मृत्यू झाला.

संशयित युवक रुग्णालयात -संशयित तरुणाने गुन्ह्यात वापरलेला चाकू व स्कूल बॅग घटनास्थळी आढळून आली आहे. संशयिताने हल्ला केल्यानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर कोरेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निखिल हा संबंधित युवतीच्या एकतर्फी प्रेमात होता. मुलीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी ( Satara Police ) दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकाराने कोरेगावच्या उत्तर भागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -विजेच्या धक्क्याने सोसायटीच्या अध्यक्षाचा मृत्यू; पत्नीसह तिघांचे वाचले थोडक्यात प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details