सातारा -पुणे बेंगलोर महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाल आहे. दुसरी बही गंभीर जखमी झाली आहे.
पाठीमागून बसली धडक -

तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय.२३) असे मृत युवतीचे नाव आहे. तिची धाकटी बहिण किरण काशीनाथ मसुगडे (वय.२१,दोघी रा.अपशिंगे.(मि.) ता.सातारा) गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी सातारकडून टाटा २०७ टोव्हिंग क्रेन भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाली होता. या टोव्हिंग क्रेनने भरतगाववाडी गावच्या हद्दीत पुढे चाललेल्या ज्युपिटर दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. दुचाकीवरील दोघी बहिणी उडून पडल्या. दुचाकीही अनेक पलट्या खाऊन महामार्गावरून खाली खड्डयात जाऊन पडली.
टोव्हिंग क्रेनचालक ताब्यात -
या अपघातात दुचाकीवरील तेजस्विनी काशिनाथ मसुगडे व किरण काशिनाथ मसुगडे गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थ व महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून दोघींनाही उपचारासाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचारापूर्वी तेजस्विनी मसुगडे हिचा मृत्यू झाला. किरण मसुगडे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टोव्हिंग क्रेनचालक इरफान मुबारक मुजावर (रा.कोल्हापूर) याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.