महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Girl Died In River Satara: मामाकडे आलेली भाची प्रीतिसंगमावर फिरायला गेली अन्... - नदीत बुडून मुलीचा मृत्यू

सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या भाचीचा कराडच्या प्रीतिसंगमावर कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी सायंकाळी घडली. सेजल बनसोडे (वय १७), असे मृत तरुणीचे नाव आहे.

Girl Died In River Satara
फिरायला गेली अन्

By

Published : Jun 8, 2023, 11:05 PM IST

सातारा: शिराळा तालुक्यातील रेठरे धरण गावातील तरुणीचा कराडच्या प्रीतिसंगमावर कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सुट्टीसाठी मामाकडे आल्यानंतर ती प्रीतिसंगमावर फिरायला गेली होती. फिरत फिरत नदीकडे गेल्यानंतर ती पाण्यात बुडाली. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. सध्या सुट्या सुरू असल्याने अनेक लोक तसेच पर्यटक संगमावर येत आहेत. त्यातच नदीला पाणी असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना होतो. त्यातूनच अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. कराडमध्ये अशी घटना या सुटीमध्ये घडली नव्हती मात्र या घटनेने शाळा सुरू होण्याच्या आधी एक दिवस उरला असताना गालबोट लागले आहे.


नातेवाईकांनी केला आरडाओरडा:शिराळा तालुक्यातील रेठरे धरण गावातील सेजल बनसोडे ही कराड नगरपालिकेचे प्रमुख मुकादम मारुती काटरे यांची भाची आहे. ती मामाकडे सुट्टीसाठी आली होती. सायंकाळी फिरण्यासाठी ती नातेवाईकांसोबत कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतीसंगम घाटावर गेली होती. फिरत फिरत ती नदीपात्राकडे गेली आणि बघता बघता नदीपात्रात बुडाली. नातेवाईकांनी आरडाओरडा करेपर्यंत ती पाण्यात बुडाली होती.


मृतावस्थेत पाण्याबाहेर काढले:घटनास्थळी धाव घेतलेल्या काही लोकांनी सेजलला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने कराड शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्याचे रिपोर्ट मात्र अजूनही आलेले नाहीत.


तरुणाचा बुडून मृत्यू:पाटण तालुक्यात अर्जुन शरद कदम या तरुणाचा देखील कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कुटुंबासह तो गाडखोप (ता. पाटण) या आपल्या मूळगावी आला होता. कदम कुटुंबीय हे कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात. गावी आल्यानंतर तो मित्रांसोबत कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्यास गेला होता. पोहताना अर्जुन बुडाला. मित्रांनी अर्जुनला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. या घटनेची नोंद कोयनानगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा:

  1. Saraswati Vaidya Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांड: 'लिव्ह इन पार्टनर'ला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी
  2. Jitendra Awhad : ४०० धर्मांतर झाल्याचे सिद्ध न केल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद - जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
  3. Minister Vikhe Patil : राज्यातील दंगली हे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान - राधाकृष्ण विखे पाटील
  4. Mumbai Crime News: 'त्या' खून प्रकरणामागे लव्ह, सेक्स अन् धोका...प्रियकर झाला हैवान!
  5. Citizen death in CMs Event Thane: विजेचा शॉक लागूनही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरुच राहिला...नागरिकाचा अखेर रुग्णालयात मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details