महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 21, 2022, 8:24 PM IST

ETV Bharat / state

Gelatin Found in Satara : दरोडेखोरांच्या दुचाकीत आढळले जिलेटीन, स्फोट घडवल्याने दुचाकी भस्मसात

कराड-ओगलेवाडी मार्गावर गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी (दि. १८) जिलेटीनच्या साहाय्याने उडवण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला होता. रात्रगस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला. यावेळी पोलिसांनी एका चोरट्याला पकडले. मात्र, पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून तिघे जण पळून गेले. त्यांच्या दुचाकीत जिलेटीन स्फोटके सापडली ( Gelatin Found in Satara ).

Gelatin Found in Satara
दरोडेखोरांच्या दुचाकीत आढळले जिलेटीन

सातारा -एटीएम दरोड्याच्या गुन्ह्यातील दरोडेखोरांची मोटारसायकल करवडी गावच्या हद्दीत पोलिसांना सापडली. गाडीच्या डिकीत देखील जिलेटीन स्फोटके आढळून ( Gelatin Found in Satara ) आली. बॉंम्ब नाशक पथकाने जिलेटीनचा स्फोट घडवून ती निकामी केली. या स्फोटात मोटरसायकलही भस्मसात झाली.

जिलेटीन आढळलेल्या दुचाकीचा स्फोट

जिलेटीनने एटीएम उडवण्याचा होता कट -कराड-ओगलेवाडी मार्गावर गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी (दि. १८) जिलेटीनच्या साहाय्याने उडवण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला होता. रात्रगस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला. यावेळी पोलिसांनी एका चोरट्याला पकडले. मात्र, पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून तिघे जण पळून गेले. जिलेटीच्या साह्याने एटीएम उडवून देण्याचा प्रयत्न निदर्शनास आल्यानंतर बॉंब नाशक पथकाने जिलेटीनचा स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये एटीएम मधील अडीच हजार रुपयांच्या नोटांचे नुकसान झाले.

माळरानावर स्फोटके केली निकामी -एका संशयितास पकडल्यानंतर इतर तिघांची नावे निष्पन्न झाली. त्यातील एक जण करवडी गावचा आहे. तपासा दरम्यान करवडी गावच्या हद्दीत एक मोटारसायकल आढळली. गाडीत जिलेटीन स्फोटके आढळून आल्याने बॉंम्ब नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. माळरानावर दुचाकीतील जिलेटीनचा स्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये दुचाकी देखील भस्मसात झाली.

वरिष्ठांच्या उपस्थितीत कारवाई -मोटरसायकलमधील स्फोटके निकामी करताना कराडचे उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपनिरीक्षक भैरव कांबळे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुचाकीतील जिलेटीनचा स्फोट घडविण्यात आला. जिलेटीनच्या स्फोटात दुचाकीने पेट घेतला आणि आगीत दुचाकी भस्मसात झाली.

हेही वाचा -मुळशी पॅटर्न हिम्मतशाळा; शाळेला रामराम ठोकलेल्यांसाठी पुन्हा 10 वीची परीक्षा देण्याची सुवर्ण संधी

ABOUT THE AUTHOR

...view details