कराड (सातारा) -शेतातील विहीर खुदाईसाठी विनापरवाना 25 जिलेटीन कांड्यांचा ( Gelatin Blast For Farm Well ) वापर करून स्फोट केल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ( Sahyadri tiger project buffer zone ) बफर झोन हादरला आहे. कोयनानगरनजीकच्या चिरंबे गावात शुक्रवारी ( Chirambe Village Blast ) रात्री उशीरा ही घटना घडली. या स्फोटामुळे चिरंबे गावाच्या परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत. याप्रकरणी कोयना पोलिासंनी जिलेटीनच्या 115 कांड्या आणि ट्रॅक्टर जप्त करत दोघांना ( Two Arrest In Satara Gelatin Blast ) अटक केली आहे.
जिलेटीन स्फोटकाचा विनापरवाना वापर -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमधील चिरंबे गावात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा स्फोट झाला. यामुळे लोक घरातून बाहेर पळाले. या स्फोटाची कोयना परिसरात चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी चिरंबे गावात छापा मारून जिलेटीनच्या 115 कांड्या आणि ट्रॅक्टर जप्त केला. तसेच संतोष अशोक पवार (36) रा. निसरे, ता. पाटण आणि इंद्रनाथ योगी (40) रा. सांगली यांना अटक केली.