महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gaur Died in Kaswand Forest :महाबळेश्वरच्या कासवंड वनक्षेत्रात प्रसुतीनंतर मादी गव्याचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ - महाबळेश्वर

महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात मादी गव्याचा प्रसुतीनंतर गर्भाशय फाटल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

Gaur Died in Kaswand Forest
Gaur Died in Kaswand Forest

By

Published : Mar 18, 2023, 10:54 PM IST

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात मादी गव्याचा प्रसुतीनंतर गर्भाशय फाटल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वन्यप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.


तपासणीत मृत्यूचे कारण स्पष्ट :पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत गव्याची तपासणी केली असता प्रसूती दरम्यान गर्भाशय फाटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. मृत गवा पैलारू होता. पहिल्याच प्रसुतीवेळी गव्याला जीव गमवावा लागला.


तांबुटा वनक्षेत्रात आढळला मृतावस्थेत : कासवंड वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेलेल्या अभिषेक पवार यांना कासवंडच्या पश्चिमेकडील तांबुटा वनक्षेत्रात गवा मृतावस्थेत दिसला. ही माहिती त्यांनी वडील सर्जेराव पवार यांना दिली. त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविले.

वन अधिकाऱ्यांनी केला घटनास्थळी पंचनामा : वन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. पशूवैद्यकीय अधिकारी जितेंद्र पाठक यांनी गव्याची तपासणी केली असता मृत गवा मादी पैलारू असल्याचे तसेच प्रसूतीनंतर गर्भाशय फाटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. घटनास्थळ दुर्गम असल्याने तेथेच गव्याचे दहन करण्यात आले.

या कारणामुळे मृत पावल्याची शक्यता : दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन्यजीवप्रेमी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. वनअधिकारी व पशूवैद्यकीय अधिकारी जितेंद्र पाठक यांनी गव्याची तपासणी असता त्यांनी हा गवा मादी पैलारू असून प्रसूती पश्च्यात गर्भाशय फाटल्याने मरण पावल्याची शक्यता वर्तवली आहे. सदर वनक्षेत्र दुर्गम असल्याने जवळपास वाहन साधने उपलब्ध नसल्याने त्याचे ठिकाणी गव्याचे दहन करण्यात आले.


बाजारपेठ, वेण्णा लेक परिसरात वावर : महाबळेश्वरमध्ये वारंवार गव्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. मागील दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठ आणि वेण्णा लेक परिसरात पर्यटकांना गव्यांचे दर्शन झाले होते. अजस्त्र गव्यांना पाहून पर्यटकांसह व्यावसायिकांची देखील भंबेरी उडाली होती.

हेही वाचा : Dhirendra Shastri in Mumbai : धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईतील दरबाराचा पहिला दिवस; 'त्या' महिलेचे मोठे वक्तव्य, म्हणाली, महाराजांवरील विश्वास...

ABOUT THE AUTHOR

...view details