Gaur in Mahabaleshwar market सातारा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील बाजारपेठेत अचानक गव्याने एन्ट्री ( forest staff drove Gaur in forest ) केली. मार्केट रस्त्याने चालत निघालेला अवाढव्य गवा पाहून पर्यटकांना धडकी भरली (Tourists shocked After Seeing ) . बाजारपेठेत गवा आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगव्याला जंगलाच्या दिशेने हाकलले. मात्र लोकवस्तीत गवा आल्याने बाजारपेठ परिसरात खळबळ उडाली होती.
वेण्णा लेक परिसरातही गव्याचे दर्शन : पर्यटकांची मोठी गर्दी असणाऱ्या वेण्णा लेक परिसरात देखील महिनाभरापुर्वी पर्यटकांना गव्याचे दर्शन झाले होते. वेण्णा लेक समोरील रस्त्यावरून रानगवा चालत जाताना पाहून कारमधील पर्यटकांची भीतीने गाळण उडाली होती. त्यानंतर आता गव्याने थेट मार्केटमध्ये एन्ट्री करत पर्यटक आणि व्यापाऱ्यांना धडकी भरवली.
वन्य प्राण्यांचा वावर वाढला :महाबळेश्वर परिसरात अनेक ठिकाणी वृक्षतोड झाली आहे. त्याठिकाणी बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत. वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत. जंगली गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. आजपर्यंत वन्यप्राण्यांकडून पर्यटकांवर हल्ला झालेला नाही. परंतु, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (forest staff drove Gaur in forest ) आहे.
महाबळेश्वरात शेकरूचेही दर्शन :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्याने मागील वर्षी एप्रिल महिन्यात पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करतात. त्यामुळे वाघाची नोंद ही महत्वपूर्ण ठरली. तसेच कोयना अभयारण्यात पर्यटकांना अस्वलाचे (स्लॉथ बेअर) आणि महाबळेश्वरमध्ये राज्यप्राणी शेकरूचे देखील दर्शन होत आहे. त्यामुळे पर्यटकांना दुहेरी मेजवानी मिळत आहे.