गॅस गळतीमुळे नागरी वस्तीत स्फोट साताराCylinder Blast : महाबळेश्वरमध्ये मंगळवारी रात्री दुर्गादेवीच्या मिरवणुकीत जनरेटरच्या स्फोटाची घटना ताजी असतानाच, बुधवारी सकाळी कराडमधील त्रिशंकू परिसर जबरदस्त स्फोटाने (Gas Cylinder Blast) हादरला. या घटनेत एकूण ९ जण जखमी (9 People Injured) झाले आहेत. स्फोटानंतर कराड शहरात एकच खळबळ उडाली.
मुजावर कॉलनी स्फोटाने हादरली : कराड शहरातील त्रिशंकू परिसरातील मुजावर कॉलनी बुधवारी सकाळी जबरदस्त स्फोटाने हादरली. शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या घराच्या भिंतीचा काही भाग सुमारे २५ फूटावर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडला. या घटनेत शरीफ मुल्ला यांच्या कुटुंबातील ९ जण जखमी झाले आहेत. शेजारील ७ घरांच्या भिंतींची मोठी पडझड झाली असून कॉलनीतील अनेक घरं धोकादायक बनली आहेत. घरांच्या पडझडीमुळे ६ दुचाकींचंही नुकसान झालं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सायंकाळपर्यंत स्फोटाचे गूढ होते कायम: शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळी ७ वाजता अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे मुल्ला कुटुंबीयांना बचावाची संधीच मिळाली नाही. त्यांच्या कुटुंबातील ५ आणि शेजारचे ४, असे ९ जण जखमी झाले. स्फोटानंतर घराला आग लागली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर आग आटोक्यात आली. सायंकाळपर्यंत या स्फोटाचे गूढ कायम होते.
गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा निष्कर्ष : साताऱ्याहून बॉंब शोधक-नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आले. मात्र तिन्ही सिलेंडर आणि शेगडी सुस्थितीत होती. मुल्ला कुटुंबीयांकडून सविस्तर माहिती घेतली असता, सकाळी घरात गॅसचा वास येत होता, अशी माहिती समोर आली. काही वेळ दारे उघडी ठेवली आणि थोड्या वेळाने महिलेने शेगडी पेटवताच मोठा स्फोट झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. यावरून गळती होऊन गॅस घरात कोंडून राहिला आणि शेगडी पेटवताच स्फोट झाला असावा, असा निष्कर्ष बीडीएस पथकाने काढला आहे.
हेही वाचा -
- Bhiwandi Fire : भिवंडीतील डाईंग फॅक्टरीला भीषण आग; पहा व्हिडिओ
- Pimpri Chinchwad fire : गॅसचा काळाबाजार पडला महागात, वाचा पिंपरी-चिंचवडमध्ये स्फोट झाला तेव्हा नेमकं काय घडलं
- Bengal Cracker factory Blast : पश्चिम बंगालमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ ठार, अनेक जखमी