सातारा :Ganeshotsav २०२३ : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी (Ganesh Festival) सुरू आहे.पुणे-सातारा मार्गावर खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वीकेंडला लागून आलेल्या गणेशोत्सवामुळे गणेशभक्त मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक (Satara News) कूर्मगतीने सुरू आहे.
कात्रज, खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी : पुण्या-मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. कात्रज घाट, खंबाटकी घाट या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam at Khambatki Ghat)झाल्याने पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या कात्रज घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळतंय.
वाहतूक कोंडीचं विघ्न : वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यातच प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. शुक्रवारी मध्यरात्री पासूनच पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक मंद गतीने सुरू आहे. अजूनही पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटलेली नाही.
वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त :कात्रज जुना घाट (Katraj Ghat) आणि खंबाटकी बोगदा परिसरात ट्रॅफिक जाम आहे. कासव गतीने वाहने पुढे सरकत आहेत. सातारा-पुणे येण्या- (Pune Satara Highway) जाण्याच्या प्रवासाला तीन तासाहून अधिक वेळ लागत आहे. खंबाटकी घाटात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा -
- Ganeshotsav Festival २०२३ : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर 'हा' नियम लागू
- Mumbai Traffic News : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमानी झाले त्रस्त, वाहतूक कोंडीचे खरे कारण काय?
- Thane Traffic Jam: ठाण्यात वाहतूक कोंडी; एकाच वेळी रस्त्यांची कामे सुरु केल्याने वाहतूक कोंडी