सातारा - जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या भयंकर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसामुळे म्हावशी गावातील अनेक घरांची पत्रे उडाली. यामुळे कोरोना महामारीच्या काळात आधीच घरात बसलेला आणि आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेला सर्वसामान्य माणूस रस्त्यावर आला आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा हात देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर - satara rainfall
बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास म्हावशी परिसरासह तालुक्यात अचानक सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने सर्वत्रच हाहाकार माजविला होता. तालुक्यासह गावातील अनेक ठिकाणांची झाडे पडली, अनेकांच्या घरावरचे छत उडाल्याने संसार उघडे पडले.
बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास म्हावशी परिसरासह तालुक्यात अचानक सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला होता. तालुक्यासह गावातील अनेक ठिकाणांची झाडे मुळासकट पडली. अगोदरच कमी प्रमणात असलेली आंबा फळे गळून पडली. याच बरोबर गावातील श्रीधर मोळावडे, आनंदा गुरव यांच्या घरावरचे पत्रे उडून गेले. घरातील धान्य, कपडे व संसारोपयोगी सर्व साहित्य भिजले. तर, आनंदा रावजी मोळावडे, जयवंतराव घाडगे, गणेश घाडगे, तानाजी मोळावडे, हणमंतराव मोळावडे यांच्यासह अनेकांची स्वमालकीची झाडे पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच शेतकरीवर्ग घरामध्ये बसला आहे. यातच श्रीधर मोळावडे व आनंदा गुरव यासारख्या काही शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. आदोगरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या अशा प्रकारच्या कुटुंबाचे आर्थिक हाल होत असताना या पावसामुळे आणखीनच कुचंबणा झाली आहे. त्यामुळे, झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे होऊन संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.