सातारा - छत्रपती राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांच्या पार्थिवावर आज शोकाकूल वातावरणात संगम माहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे नातू कौस्तुभादित्यराजे पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला.
चंद्रलेखाराजे भोसले पंचत्वात विलीन, माहुलीच्या राजघाटावर नातवाने दिला अग्नी - satara chhatrapati family news
साताऱ्यातील छत्रपती राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले काल (रविवारी) दुपारी चंद्रलेखाराजे भोसले (वय ७२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. आज त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात संगम माहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल (रविवारी) दुपारी चंद्रलेखाराजे भोसले (वय ७२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी ९ वाजता त्यांच्या 'अदालत वाडा' या राजप्रासादातून अंत्ययात्रा सुरू झाली. सजवलेल्या पालखीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. ही पालखी फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आली होती. शाहूरस्ता मार्गे नगरपालिका व तेथून पोवईनाकामार्गे संगम माहुली अशी अंत्ययात्रा काढण्यात आली.
माहुलीच्या राजघाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रलेखाराजे यांचे बंधू माजी खासदार सत्यजीतसिंह गायकवाड तसेच राजघराण्यातील स्नेही व सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.