महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील चौथा रुग्ण 'कोरोना मुक्त'; डॉक्टरांनी टाळ्या वाजवून दिला डिस्चार्ज

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातील चौथा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. जावळी तालुक्यातील या तरुणाला बाधा झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते.

corona in satara
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातील चौथा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय.

By

Published : Apr 27, 2020, 4:31 PM IST

सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातील चौथा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. जावळी तालुक्यातील या तरुणाला बाधा झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी संबंधित माहिती दिलीय.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातील चौथा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय.

जावळी तालुक्यातील एकजण, खंडाळा तालुक्यातील महिला तर, कराड तालुक्यातील एक तरुण अशा तीन कोरोना बाधितांना यापूर्वी घरी सोडण्यात आले आहे. या सर्वांना कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना तत्काळ क्वारंटाईन करून स्वॅब टेस्टींगसाठी पाठवण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधितांवर उपचार सुरू होते. आता शेवटची टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून हा युवक त्याच्या घरी गेला. पुढचे चौदा दिवस त्याला घरातच क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details