महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमुख्याधिकाऱ्यासह सातारा पालिकेतील चौघांना लाच घेताना अटक - acb

सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संचित दुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे य‍‍ांच्यासह दोन आरोग्य निरीक्षक‍‍ांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

satara acb
उपमुख्याधिकाऱ्यासह सातारा पालिकेतील चौघांना सव्वादोन लाखांची लाच घेताना अटक

By

Published : Jun 9, 2020, 1:32 PM IST

सातारा - सातारा नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित दुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे य‍‍ांच्यासह दोन आरोग्य निरीक्षक‍‍ांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. संचित कृष्णा धुमाळ (वय ३३, मूळ रा. रायकर नगर धायरी पुणे), गणेश दत्तात्रय टोपे (वय ४३, रा. यादोगोपाळ पेठ सातारा), प्रवीण एकनाथ यादव (वय ५१, रा.धादमे कॉलनी करंजे पेठ) आणि राजेंद्र कायंगुडे ( रा. गोडोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कचरा उचलण्याच्या ठेक्यातील १५ लाख रुपयांची अनामत रक्कम ठेकेदाराला परत करण्यासाठी य‍ा चौघांनी 2 लाख 30 हजार रुपयांची मागणी ठेकेदाराकडे केली होती. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज नगरपालिकेत सापळा लावला होता.

आपल्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना संचित धुमाळ याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

ABOUT THE AUTHOR

...view details