सातारा -जिल्ह्यात जावळी तालुक्यातील मेढा येथील मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये आई वडिलांसह दोन मुलांचा समावेश असून तीन मृतदेह सापडले आहेत. तसेच एका मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.
साताऱ्यातील मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या - सातारा कौटुंबीक हत्या
सातारा जिल्ह्यातील मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोली येथील रहिवासी आहे.
पोलिसांना गेल्या ११ ऑगस्टला मार्ली घाटात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २९ ऑगस्टला एका महिलेचा मृतदेह सापडला. याच तपासात हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोली गावातील असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन्ही मुलांची शोध घेण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाचा मृतदेह सोमवारी सापडला असून महाबळेश्वर पोलीस दुसऱ्या मुलाचा ट्रेकर्सच्या मदतीने दुसऱ्या मुलाचा मृतदेह शोधत आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरे कारण अद्याप समोर आले नाही. हा नेमका काय प्रकार आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.