सातारा - जिल्ह्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये ४ जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावर ( Pune-Bangalore Highway ) कराडजवळ २२ प्रवशांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स ( 8 injured in Travels accident ) पलटी होऊन ८ जण जखमी झाले आहेत. खंडाळा हद्दीतील 'एस' कॉर्नरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार ( Two killed in truck accident ) झाले, तर रविवारी रात्री उशीरा महाबळेश्वर रस्त्यावर दोन दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.
'एस' कॉर्नरवर माल ट्रकच्या अपघातात 2 ठार :स्टील घेऊन पुण्याकडे निघालेल्या मालट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने खंडाळा येथील 'एस' कॉर्नरवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालक सुरज हैदर शेख (वय २४, रा. वेळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) आणि विष्णू गोपाळ सुरनर (वय २२) हे मालट्रकखाली सापडून जागीच ठार झाले. अपघातामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.