महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Accident : आष्टानजीकच्या गातडवाडी गावात कार-डंपरचा भीषण अपघातात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - आष्टा कार डंपर अपघात

आष्टानजीकच्या गातडवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी कारला भीषण ( Car Dumper Accident In Satara ) अपघात झाला. डंपर पाठीमागून धडक दिल्याने मलकापूर (ता. कराड) येथील एकाच कुटुंबातील चौघेजणांचा ( Four Death In Satara Car Dumper Accident ) या अपघातात मृत्यू झाला आहे.

Satara Accident Death
Satara Accident Death

By

Published : Mar 26, 2022, 7:00 PM IST

कराड (सातारा) -पेठ-सांगली मार्गावर आष्टानजीकच्या गातडवाडी गावच्या हद्दीतन ( Car Dumper Accident In Satara ) आज सकाळी कारला भीषण अपघात झाला. डंपरने पाठीमागून धडक दिल्याने मलकापूर (ता. कराड) येथील एकाच कुटुंबातील चौघेजणांचा या अपघातात ( Four Death In Satara Car Dumper Accident ) मृत्यू झाला आहे. सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जाताना ही दुर्घटना घडली. मलकापूरचे व्यवसायिक अधिकाराव पोळ (४९) त्यांची आई गीताबाई जगन्नाथ पोळ (७०) पत्नी सुषमा (४२) आणि भावजय सरीता सुभाष पोळ (३५), अशी मृतांची नावे आहेत. त्यांची पुतणी सुदैवाने बचावली आहे.

पोळ कुटुंबावर काळाचा घाला -अधिकराव पोळ हे आज सकाळी कुटूंबियांसह सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला कारमधून निघाले होते. कारमध्ये पाच जण होते. गातडवाडी गावच्या हद्दीत समोरील वाहनाने ब्रेक मारला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या डम्परने कारला जोरात धडक दिली. त्यामुळे त्यांची कार दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडली. मागील वाहनाची जोरात धडक बसल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला केला.

माहिती मिळताच मित्र-परिवार घटनास्थळी -अधिकराव पोळ यांचा टायर विक्री तसेच कापड विक्रीचा व्यवसाय होता. सामाजिक कार्यात देखील त्यांचा पुढाकार असायचा. संगम हेल्थ क्लबचे ते सदस्य होते. त्यांच्या कारच्या अपघाताची माहिती मिळताच मित्र परिवाराने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोळ यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने मलकापूर परिसरावर शोककळा पसरली असून मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा -Girish Bapat Leave Meeting : 40 वर्षात पहिल्यांदा कालवा समितीची बैठक; पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर आंदोलन - खासदार गिरीश बापट

ABOUT THE AUTHOR

...view details