सातारा: गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार ( Incessant rain in Satara ) आहे. यामुळे छोटी धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरली आहेत. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील विक्रमी पाऊस ( Record rainfall in Koyna Dam area ) झाला आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरणात तब्बल साडे चार टीएमसी पाण्याची आवक ( four and a half tmc water inflow in Koyna dam ) झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील आवक प्रतिसेकंद 50 हजार क्युसेकवर पोहोचली ( water in the Koyna Dam arrivals at 50,000 cusecs per second ) आहे. धरणातील पाणीसाठा 73.18 टीएमसी ( Koyna dam water storage capacity ) झाला आहे.
नवजा येथे उच्चांकी पाऊस-नवजा येथे चोवीस तासात 226 मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला आहे. महाबळेश्वरमध्ये 197 मिलीमीटर आणि कोयनानगरमध्ये 175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 49,654 क्युसेक पाण्याची प्रतिसेकंद आवक सुरू आहे.