महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मलकापूरमधील कोरोनाबाधिताचा मृत्यू; 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह - कराड कोरोना अपडेट

कृष्णा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे 47 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात 422 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

krishna hospital karad
कृष्णा रुग्णालय कराड

By

Published : May 28, 2020, 2:43 PM IST

कराड (सातारा)- मलकापूर (ता. कराड) येथील 47 वर्षीय कोरोनाबाधिताचा गुरुवारी पहाटे मृत्यु झाला. पनवेल येथून प्रवास करुन आल्यानंतर तो मलकापूर येथील घरात राहत होता. अस्वस्थ वाटू लागल्याने 21 मेला त्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला होता. तो मुळचा बाचोली (ता. पाटण) येथील आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 191 आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 39, असे एकूण 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात 422 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. 281 रुग्णांवर उपचार सुरु असून 15 जणांचा मृत्यु झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details