सातारा -राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर ( वय ९२) यांचे पळसावडे ( ता.माण ) येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक - महादेव जानकर यांच्या आईचा मृत्यू
माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक झाला आहे. पळसावडे येथे श्रीमती गुणाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्यात भाजपा शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असताना राज्याचे मत्स्य, दुग्ध विकास व पशु संवर्धन मंत्री पदावर असतानाही श्रीमती गुणाबाई यांचे राहणीमान साधेच राहिले. मुलगा मंत्री असतानाही त्याच्या बंगल्यात किमती गालीच्याची सुविधा असतानाही त्या लोकरीचे घोंगडे अंथरुण मुक्कामी राहत होत्या. त्यांच्या साध्या राहणीमानाची छायाचित्रे सोशल मिडीयासह विविध वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. पळसावडे येथे श्रीमती गुणाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.