महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 6, 2021, 4:49 PM IST

ETV Bharat / state

नागरिकांनी न घाबरता लसीकरण करावे - पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. दरम्यान कोरोना लसीकरणाचे कुठलेही साईडइफेक्ट नसून, नागरिकांनी न घाबरता कोरोना लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली कोरोना लस
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली कोरोना लस

कराड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. दरम्यान कोरोना लसीकरणाचे कुठलेही साईडइफेक्ट नसून, नागरिकांनी न घाबरता कोरोना लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, प्रांताधिकारी उत्तम दिघे उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांचे बंधू अधिकराव चव्हाण आणि केअर टेकर नामदेव चन्ने, अशा तीन जणांना यावेळी लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल अशी माहिती वैद्याकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नागरिकांनी न घाबरता लसीकरण करावे

'नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे'

दरम्यान, नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी, तसेच सामाजिक अंतराचे पालन आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. लस घेण्यापूर्वी त्यांनी कोविड लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. लसीकरण केंद्राची पाहणी करून वैद्यकीय अधिक्षक प्रकाश शिंदे यांच्याकडून कोविड लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, राहूल चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा -'आता कुठलीही कुबडी नको, महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणू'

ABOUT THE AUTHOR

...view details