सातारा - प्रसाद चौगुले याने मिळवलेले यश हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसादचे कौतुक केले. कराडचा सुपुत्र प्रसाद चौगुले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उपजिल्हाधिकारी संवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसाद चौगुलेचा सत्कार केला.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसादचे यश प्रेरणादायी - पृथ्वीराज चव्हाण - सातारा न्यूज
प्रसाद चौगुले याने मिळवलेले यश हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसादचे कौतुक केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसादचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पहिल्याच प्रयत्नात प्रसादने राज्यात प्रथम क्रमांक पटवला. ही कराड तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असे चव्हाण म्हणाले. राज्यात अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या स्वप्नाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतात. प्रसादला सहज यश मिळालेले नाही. त्याने घेतलेल्या कष्टाचाही त्यात वाटा आहे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर प्रसाद चौगुले याने आदर्श ठेवला असल्याचेही चव्हाण म्हणाले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची एक दिशा ठरविलेली असते. एखाद्या विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती असते. स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा, असे आवाहन देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.