महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदारसाहेब किंमत नसणाऱ्यांसोबत फिरू नका, हे वागणं बरं नव्हं - दिलीप येळगावकर

खऱ्या अर्थाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांचे योगदान आहे.

खासदारांचा आमदारांना सल्ला

By

Published : May 28, 2019, 7:45 PM IST

सातारा - मित्र प्रेम म्हणून बदनाम व किंमत नसणाऱ्यांना घेऊन फिरू नका, खासदारांनी आता असे वागणे थांबवायला हवे, असा सल्ला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना खटावचे भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी दिला आहे. ते साताऱ्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपचे माण खटावचे तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. येळगावकर म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी झाली होती. त्यातून संजय शिंदे यांनी काढता पाय घेतल्याने आघाडीला भवितव्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे माणच्या आमदारांनी पळवाट शोधली. आमदार गोरे यांच्यावरती खंडणी तसेच इतर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यातून वाचण्यासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला, पण आमदारांची खटाव तालुक्यातील संघटना पूर्णपणे विस्कळीत झाली. राजकारणातील त्यांचा हा शेवटचा खटाटोप आहे. खऱ्या अर्थाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांचे योगदान आहे.

पण आमदार गोरे म्हणतात, मी सर्व केले, माण विधानसभा मतदारसंघात खटाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व एक नगरपंचायत असताना केवळ १० हजार ४४१ एवढे मतदान निंबाळकरांना मिळाले. तर शेखर गोरे माणमध्ये असतानादेखील संपूर्ण तालुक्यातून भाजपला केवळ १२ हजार ७७४ मताधिक्य मिळाले. तर आंधळी बिदाल जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादीपेक्षा भाजप उमेदवाराच्या थोडीच जास्त मते मिळाली. म्हसवड पालिका शेखर गोरे यांच्याकडे दहिवडी नगरपंचायत आमदारांकडे मग मते गेली कुठे..? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. नक्की खासदार कोणाचा भाजपचा की काँग्रेसचा...? आमदार गोरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, स्थानिक ठिकाणाहून भाजपचे कार्यकर्ते त्यांना विरोध करत आहेत. यामुळे विखे-पाटील यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे यांचा भाजप प्रवेश होणार की नाही..? हा येणारा काळच ठरवेल.

ABOUT THE AUTHOR

...view details