महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खंडणीप्रकरणात पोलिसांना गुंगारा देणारा वनपाल अखेर शरण...अद्याप दोघे फरार! - borgaon police

शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी येथील युवकाकडून 25 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वनपाल योगेश गावीत अखेर बोरगाव पोलिसांना शरण आला आहे.

forest officer accused in extortion case
खंडणीप्रकरणात पोलिसांना गुंगारा देणारा वनपाल अखेर शरण...अद्याप दोघे फरार!

By

Published : Oct 27, 2020, 4:12 AM IST

सातारा - शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी येथील युवकाकडून 25 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वनपाल योगेश गावीत अखेर बोरगाव पोलिसांना शरण गेला आहे. यापूर्वी वनरक्षक महेश सोनवले याला अटक करण्यात आले असून त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. वनपाल योगेश गावीत याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील दोन वनरक्षक अद्याप फरार आहेत.

खंडणीप्रकरणात पोलिसांना गुंगारा देणारा वनपाल अखेर शरण...अद्याप दोघे फरार!
पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 25 हजार रुपयांची खंडणी उकळली होती. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. याची तक्रार ओंकार शिंदे याने 5 सप्टेंबरला बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित, वनरक्षक महेश साहेबराव सोनवले, रणजित व्यंकटराव काकडे व किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून चौघेही फरार झाले होते. गावित व सोनावले यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना शरण येण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता.

महेश सोनवले याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. सायंकाळी गावितला ताब्यात घेण्यात आले. खंडणीप्रकरणातील अन्य दोन वनरक्षक रणजित काकडे व किशोर ढाणे अद्याप फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी, बोरगावचे सहाय्यक निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details