कराड (सातारा) - कराड येथे एका विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना ( leopard cub fall in well in karad ) घडली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर त्या बिबट्याच्या पिल्ल्याला वाचवण्यात यश आले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा विहिरीत सोडून त्या बिबट्याच्या पिल्ल्याचे प्राण वाचले.
Satara Forest Department Rescues : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्ल्याचे वनविभागाने केले रेस्क्यू, पाहा व्हिडिओ... - सातारा वन विभाग
कराड येथे एका विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची ( leopard cub fall in well in karad) घटना घडली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर त्या बिबट्याच्या पिल्ल्याला वाचवण्यात यश आले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा विहिरीत सोडून त्या बिबट्याच्या पिल्ल्याचे प्राण वाचले.
रेस्क्यू मोहिम यशस्वी करत बिबट्याच्या पिल्लाला दिले जीवदान - कराड तालुक्यातील कोळे या गावात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. विहिरीत पिंजरा सोडून एक तासाच्या प्रयत्नानंतर पिल्लाला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले. वीजपंप सुरू करण्यासाठी विहिरीवर गेलेल्या शेतकर्याला विहिरीत बिबट्याचे पिल्लू दिसले. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचे पिल्लू बिथरले होते. विहिरीतील एका दगडावर ते बसले होते. विहिरीला पायर्या नसल्याने आणि विहिर खोल असल्यामुळे दोरी बांधून पिंजरा खाली सोडण्याचा निर्णन वन अधिकार्यांनी घेतला. पिंजर्याच्या साह्याने पिल्लाला तासाभराच्या प्रयत्नानंतर विहिरीतून बाहेर काढले. या पिल्लाला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याचे वन क्षेत्रपाल तुषार नवले यांनी सांगितले. वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्यासह बाबूराव कदम, डॉ. सावने, वनरक्षक उत्तम पांढरे, भारत खटावकर, अरविंद जाधव, वनमजूर मयूर जाधव, योगेश बडेकर, अरुण शिबे यांच्या पथकाने ही रेस्क्यू मोहिम यशस्वी करत बिबट्याच्या पिल्लाला जीवदान दिले.
हेही वाचा -Beaten Video In Fatehabad : जावयासह आई-वडिलांना मारहाण; व्हिडीओ व्हायरल