महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard in house : घरात घुसलेल्या बिबट्याला वनविभागाने केले पिंजऱ्यात जेरबंद - Forest department carrying out rescue operation

पाटण तालुक्यातील कोयनानगर नजीकच्या हेळवाक गावातील एका घरात गुरूवारी ११ च्या सुमारास बिबट्या शिरल्याने (leopard entered house ) एकच खळबळ उडाली. वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ( Forest department carrying out rescue operation ) बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर हेळवाक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Leopard in house
घरात बिबट्या

By

Published : Oct 7, 2022, 11:12 AM IST

Updated : Oct 7, 2022, 1:17 PM IST

सातारा: पाटण तालुक्यातील कोयनानगर नजीकच्या हेळवाक गावातील एका घरात गुरूवारी ११ च्या सुमारास बिबट्या शिरल्याने (leopard entered house)एकच खळबळ उडाली. सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात हा बिबट्या शिरला होता. वनविभागाने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ( forest department imprisoned leopard in cage ) हेळवाक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Leopard in house


कुत्र्याच्या मागोमाग बिबट्याही घरात घुसला :कारंडे कुटुंबीय गुरूवारी रात्री दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी एक कुत्रा त्यांच्या घरात गेला. त्याच्या मागोमाग बिबट्याही घरात घुसला. बिबट्या घरात शिरल्याचे पाहून सुधीर कारंडे यांनी घराचे दार बंद केले. तसेच वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. बिबट्याचा अंदाज घेऊन घराच्या पाठीमागील दाराजवळ पिंजरा लावला. घरापुढे मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. त्यामुळे मागील दाराने बाहेर जाताना बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झ़ाला.


बिबट्याच्या डोळ्याला मोतिबिंदू, पायाने लंगडा :बिबट्या एक वर्षे वयाचा असून त्याच्या एका डोळ्याला मोतिबिंदू झाला आहे, तर एका पायाने तो लंगडत आहे. त्यामुळे बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात येणार आहे. बिबट्यास सुखरुप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनी त्यांना सहकार्य केले.

Last Updated : Oct 7, 2022, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details