महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडवर धुक्याची चादर, प्रितीसंगम हरवले दाट धुक्यात - प्रीतिसंगम

सातारा जिल्ह्यात थंडी वाढत असून कराडचा प्रितीसंगम आणि कृष्णा घाट परिसर संपूर्णपणे धुक्यात हरवले होते. तर कराड शहरातही धुक्याची चादर पसरली होती.

धुक्यात हरवलेले प्रीतिसंगम
धुक्यात हरवलेले प्रीतिसंगम

By

Published : Feb 8, 2020, 1:07 PM IST

सातारा- कराडकरांसाठी शनिवारची (दि. 8 फेब्रुवारी) पहाट आल्हाददायक ठरली. प्रितीसंगम आणि कृष्णा नदीचा घाट दाट धुक्यात हरवून गेला. कराडकरांना शनिवारी खूप उशीराने सूर्यदर्शन झाले. दाट धुक्यामुळे दिवे लावून वाहने धावत होती.

प्रीतिसंगम हरवले दाट धुक्यात

शनिवारी पहाटे गुलाबी थंडी आणि दाट धुके, असे आल्हाददायक वातावरण होते. धुक्याची चादर कराडवर पसरली होती. या वातावरणाचा आनंद आज कराडकरांनी लुटला. अबालवृद्धांनी धुके अनुभवण्यासाठी प्रितीसंगम आणि कृष्णा नदी घाटावर मोठी गर्दी केली होती. कराडची बाजारपेठ आणि गल्लीबोळातही धुके पसरले होते. शाळा-महाविद्यालयांचा परिसरही दाट धुक्यात हरवून गेला होता. कराड-विटा राज्य मार्गावरील कृष्णा पुलावर धुक्याची चादर पसरली होती.

हेही वाचा - आईचा खून करणाऱ्यास पाच महिन्यानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details