साताराकराड तालुक्यातील येणके गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते 75 ध्वजांचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे विधवा प्रथा बंदीचा ठराव हळदी कुंकवाच्या उपक्रमानंतर येणके गावाने विधवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल टाकले आहे
विधवांच्या हस्ते ध्वजारोहणाचा निर्णय ठरणार ऐतिहासिक येणके हे तीन हजार लोकसंख्या असलेले कराड तालुक्यातील गाव विधवा प्रथा बंदीच्या ठरावांना सुरूवात झाल्यानंतर येणके गावाने देखील ठराव घेतला त्याही पुढे जाऊन विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आता 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे
गावात सर्व्हे करून विधवांना मान सन्मान देण्याचा निर्णय भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात उत्साह आहे यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत आजवर देशात कुठेही विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नाही मात्र येणके गावाने एकाच विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोह करण्याऐवजी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला अंगणवाडी सेविका आशा सेविका सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावामध्ये सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये 137 माता-भगिनी विधवा असल्याचे निदर्शनास आले त्यांना ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले
शाळेच्या प्रांगणात होणार ध्वजारोहणयेणके गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोमवारी 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते 75 ध्वजांचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी हा सोहळा संपन्न होणार आहे शालेय विद्यार्थी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन तरूण तरूणी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित राहणार आहेत येणके गावातील हा सोहळा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक ठरणार आहे
हेही वाचा -Best Of Bharat भारतीय कलाकृतीत अतुलनीय योगदान देणारे 10 प्रसिध्द भारतीय कलाकार