महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग; बैलगाडा शर्यतीच्या आयोजकासह पाच जणांवर गुन्हा दाखल - पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे

शर्यतीचे आयोजन करणारा सोन्या पिसाळ आणि शर्यतीत भाग घेणार्‍या विकास बापू सुर्यवंशी , प्रदीप सुरेश धनवे, गणेश लालासो आवळे आणि आनंदा लक्ष्मण चौधरी या बैलगाडी मालकांवर गुन्हा नोंद झाला आहे.

बैलगाडी शर्यतीच्या आयोजकासह पाच जणांवर गुन्हा

By

Published : Oct 7, 2019, 4:28 AM IST


सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून कराड तालुक्यातील करवडी गावातील शिवारात बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केल्याने आयोजकासह पाच जणांवर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शर्यतीचे आयोजन करणारा सोन्या पिसाळ आणि शर्यतीत भाग घेणार्‍या विकास बापू सुर्यवंशी (रा. धोत्रेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), प्रदीप सुरेश धनवे (रा. हनुमानवाडी,ता. कराड), गणेश लालासो आवळे आणि आनंदा लक्ष्मण चौधरी (रा. चरेगाव ता. कराड) या बैलगाडी मालकांवर गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा -भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांचा मृत्यू

करवडी गावच्या शिवारात डोंगराकडेच्या माळरानात चाकोर्‍या पाडून बैलगाड्यांच्या शर्यती सुरू असल्याची माहिती रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व कर्मचार्‍यांना घटनास्थळी जाऊन खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार उपनिरीक्षक डांगे हे कर्मचार्‍यांसह तेथे पोहोचले असता बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होत्या. शर्यतीसाठी दहा-बारा बैलजोड्या तेथे थांबलेल्या होत्या. तसेच बैलांना आणलेली वाहनेही तेथे उभी होती. पोलीस आल्याचे पाहून काही बैलमालक आणि वाहन चालक बैलगाड्या घेऊन डोंगराच्या दिशेने पळून गेले. मात्र, विकास सुर्यवंशी, प्रदीप धनवे, गणेश आवळे हे पोलिसांच्या तावडीत सापडले. आनंदा चौधरी छोटा हत्ती गाडीतून बैलांना घेऊन जाताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सोन्या पिसाळ याने बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पाच जणांवर कराड तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details