महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात 'म्युकर मायकोसिस'चे आणखी पाच बळी; मृतांची संख्या 24 वर - सातारा कोरोना लेटेस्ट अपडेट

जिल्ह्यात 'म्युकर मायकोसिस'चे आत्तापर्यंत 135 बाधित रुग्ण आढळले असून, यातील 24 जणांचा बळी गेला आहे. तर 51 जणांनी या आजारावर मात केली असून, 60 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात 'म्युकर मायकोसिस'चे आणखी पाच बळी
जिल्ह्यात 'म्युकर मायकोसिस'चे आणखी पाच बळी

By

Published : Jun 21, 2021, 7:45 AM IST

सातारा: जिल्ह्यात कोरोनाचा आकडा रोडावला असला तरी कोरोना पश्चात 'म्युकर मायकोसिस' या आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. 'म्युकर मायकोसिस'मुळे आणखी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, बळींचा आकडा 24 इतका झाला आहे.

आजार वाढल्यास जीवावर बेतू शकते

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. डोळ्यांना सूज, नाकाला सूज, डोळे लाल होणे अशी सुरुवातीला लक्षणे आढळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार अधिक संभवतो. आजार वाढल्यास मेंदूपर्यंत जाऊन रुग्णांच्या जीवावर बेतू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

रोगप्रतिकारक शक्ति कमी असलेल्यांना धोका

साताऱ्यातील खाजगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालय व काही रुग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो. डोळे आणि नाकाला इन्फेक्‍शन होते. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. सायनस मध्ये नाका भोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. ही बुरशी हवेतून पसरते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 135 बाधित रुग्ण

जिल्ह्यात 'म्युकर मायकोसिस'चे आत्तापर्यंत 135 बाधित रुग्ण आढळले असून, यातील 24 जणांचा बळी गेला आहे. तर 51 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्याच्या घडीला 60 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अनेक खाजगी रुग्णालयात अशा रुग्णांची नोंद असून, त्यांनी आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती कळवावी, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केल्या आहेत.

हेही वाचा -राज्यात रविवारी 9361 कोरोना रुग्णांची भर; तर 190 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details