कराड (सातारा) - कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या मूळ रहिवासी आणि मुंबई पोलीस दलात अधिकारी असणाऱ्या महिलेसह पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
'महिला पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांची कोरोनावर मात' - karad corona news
मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून, उंब्रज येथील 29 वर्षीय महिला कार्यरत आहे. सेवेत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या.
मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून, उंब्रज येथील 29 वर्षीय महिला कार्यरत आहे. सेवेत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या. त्यांच्यासह वानरवाडी (ता. कराड) येथील 25 वर्षीय युवक आणि 25 वर्षीय महिला, सदुवर्पेवाडी-सळवे (ता. पाटण) येथील 30 वर्षीय महिला आणि नवारस्ता (ता. पाटण) येथील 12 वर्षीय मुलगी, अशा एकूण 5 जणांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिवाय कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.