महाराष्ट्र

maharashtra

सातारा : मलकापूरच्या जुनेद शेख टोळीतील फरार 5 जणांना मोक्काअंतर्गत अटक

By

Published : Jan 1, 2020, 2:18 PM IST

कराडनजीकच्या मलकापूरमधील गुंड जुनेद शेख याच्या टोळीतील 5 फरार आरोपींना कराड पोलिसांनी अटक केली आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

सातारा- कराडनजीकच्या मलकापूरमधील गुंड जुनेद शेख याच्या टोळीतील 21 जणांवर ऑक्टोबरमध्ये मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यातील फारार असणार्‍या 5 जणांना कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांच्या पथकाने मंगळवारी (दि. 31 डिसें.) मोक्का गुन्ह्यात अटक केली.


अकिब लियाकत पठाण (वय 20), अक्षय साहेबराव धुमाळ (वय 23), सॅम उर्फ समीर नूरमहमंद मोमीन (वय 25), अल्फाज कासीम शेख (वय 20), आयुब अब्दुल गफार ब्याळी (वय 34 वर्षे, सर्व रा. मलकापूर, ता. कराड), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कराडातील गुंड पवन सोळवंडे याच्यावर बेछूट गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जुनेद शेख व त्याच्या टोळीतील 21 जणांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्तावही विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी या टोळीतील 15 जणांना मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली होती. मात्र, 5 जण फरार होते. त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत कराडातील गुंडांच्या 3 टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे. यापुढे आणखी काही जणांवर मोक्काची कारवाई होण्याची शक्यता आहे. मोक्कांतर्गत कारवाई करून कराड पोलिसांनी गुंडांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, काही दिवसांपासून कराडच्या गुन्हेगारी वर्तुळात शांतता आहे.

हेही वाचा - कराड येथे तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त प्राध्यापकाला गंडविले; चेन, अंगठी केली लंपास

ABOUT THE AUTHOR

...view details