महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

School Bus Fire: शॉर्टसर्किटमुळे स्कूल बसने घेतला पेट, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचले विद्यार्थ्यांचे प्राण

School Bus Fire: विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बसने School bus caught fire due to short circuit अचानक पेट घेतल्याची घटना सातारा- कोरेगाव रस्त्यावरील खावली गावानजीक घडली. चालत्या स्कूल बसमधून धूर येत असल्याची बाब चालकाच्या लक्षातही आली नव्हती. मात्र, ड्युटीवरून घरी निघालेल्या पोलिसाने प्रसंगावधान दाखवत चालकाला बस थांबवायला लावत क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांना खाली उतरवून त्यांचे प्राण वाचवले आहे.

School Bus Fire
School Bus Fire

By

Published : Oct 1, 2022, 11:01 PM IST

सातारा: विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बसने School bus caught fire due to short circuit अचानक पेट घेतल्याची घटना सातारा- कोरेगाव रस्त्यावरील खावली गावानजीक घडली. चालत्या स्कूल बसमधून धूर येत असल्याची बाब चालकाच्या लक्षातही आली नव्हती. मात्र, ड्युटीवरून घरी निघालेल्या पोलिसाने प्रसंगावधान दाखवत चालकाला बस थांबवायला लावत क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांना खाली उतरवून त्यांचे प्राण वाचवले आहे.

स्कूल बसमध्ये होते २१ विद्यार्थीशनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन कोरेगावकडे निघालेल्या स्कूल बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन वायरिंग जळाले. त्यामुळे बसच्या खालच्या बाजूने धूर येऊ लागला. बसने अचानक पेट घेतला. मात्र, ही बाब चालकाच्या लक्षात आली नव्हती. सुदैवाने ड्युटी संपवून घरी निघालेल्या एका पोलिसाला बसमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत बस थांबवून विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह चालकाचेही प्राण वाचले आहे.

पोलिसाच्या प्रसंगावधानाचे कौतुकया घटनेवेळी परिसरातील ग्रामस्थही घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे काही वेळातच बसला लागलेली आग विझवण्यात यश आले. मात्र, या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे नागरिकांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details