सातारा- गर्दी करून विहिरीत पोहायला जाणे युवकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी उंब्रज (ता. कराड) येथील ७ युवकांवर जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या मसूर (ता. कराड) येथील दोन युवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उंब्रजच्या माणिक चौकातील ७ युवक रविवारी गावाजवळच्या विहिरीत पोहायला गेले होते. त्यांच्यावर पोलिसांनी संचारबंदीत गर्दी करून पोहायला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय बापूसाहेब जाधव, प्रसाद सुधाकर जाधव, संभाजी दिलीप जाधव, योगेश रवींद्र घाडगे, ओंकार रवींद्र घाडगे, वैभव भिकू रावते आणि किशोर विजय पाटणकर (रा. माणिक चौक, उंब्रज, ता. कराड), अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व युवक २० ते २५ वयोगटातील आहेत.