सातारा- कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना रात्री 10 वाजता मंगळवार तळ्याजवळ इव्हिनींग वॉक करणाऱ्या 10 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
साताऱ्यात इव्हिनींग वॉक करणाऱ्या 10 जणांवर गुन्हे दाखल - satara evening walk
पोलीस पेट्रोलिंग करत असताना रात्री मंगळवार तळ्याजवळ, आंब्याच्या झाडाजवळ इव्हिनींग वाक करत असताना या लोकांवर कारवाई करण्यात आली.
दिलीप रामचंद्र फासे (वय - 54, रा . 276 ब मंगळवार पेठ), अमेश हणमंत शेंडे (वय - 59 रा . सिद्धदरा अपार्टमेंट 178 मंगळवार पेठ), विठ्ठल भिकु देवरे (वय - 46 रा . 148 चिमणपुरापेठ), नितीन रामचंद्र येवले (वय - 30 रा. गडकर आळी, सर्वोदय सोसायटी शाहुपूरी), प्रदिप पांडुरंग जोशी (वय - 60, रा . राधेय अपार्टमेंट मंगळवार तळे), सुरेश वासुदेव नारकर (वय - 60, रा . मंगळवार पेठ), रविकाल सदाशिव जोशी (वय - ३५, रा. 14 व्यंकटपुरा पेठ), शिवाजी शंकर जाधव (वय - 75, रा. 14 व्यंकटपुरा, देवेष अपार्टमेंट), सहिदास निवृत्ती जाधव (वय - 65 रा . कृष्णेश्वर पार्क सिद्धी हाईट्स ग्राऊंड फ्लोअर , 106 व्यंकटपुरा पेठ) व संजय गणेश दिक्षीत (वय - 56, रा . 134 मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस पेट्रोलिंग करत असताना रात्री मंगळवार तळ्याजवळ, आंब्याच्या झाडाजवळ इव्हिनींग वाक करत असताना या लोकांवर कारवाई करण्यात आली. लाॅकडाऊनच्या काळात घराबाहेर पडून त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा, जमाव बंदी, संचारबंदी आदेश आदींचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस नाईक धनंजय कुंभार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.