कराड (सातारा) - विनापरवाना कोरोना चाचणी करून रुग्णाची लुबाडणूक केल्याप्रकरणी मल्हारपेठ (ता. पाटण) येथील डॉक्टरसह लॅब चालकावर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. वनारसे आणि लॅब चालक अनिल इनामदार अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल इनामदार यास अटक करण्यात आली आहे तर डॉक्टर फरार झाला आहे.
पाटण तालुक्यातील नवसरी येथील दत्तात्रय राजाराम उदुगडे यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात तक्रार दिली होती. डॉ. वनारसे व यशवंत लॅब चालक अनिल इनामदार यांनी संमतीविना रक्त चाचणी केली. रक्त चाचणीची कोणतीही कायदेशीर परवानगी दोघांनी घेतली नाही. चाचण्या करण्याचा यशवंत लॅबकडे परवाना नाही. तरीसुध्दा चाचणी केली. तसेच कोव्हिड-१९ अॅन्टीबॉडी चाचणी निगेटेव्ह असताना चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे लॅब चालकाने सांगितल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. तसेच याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.