महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वनवा लावला म्हणून वाईच्या मुख्याध्यापकासह शिक्षिकेला दंड - वणवा वाई जंगल न्यूज

शिवाजी पार्टे व नीलिमा खरात यांनी गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कचऱ्यातील कागद व पालापाचोळा वाऱ्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला त्यामुळे ही आग वनक्षेत्रामध्ये पसरल्याचे वनाधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

वणवा
वणवा

By

Published : Mar 20, 2021, 5:53 PM IST

Updated : Mar 20, 2021, 7:33 PM IST

सातारा : वनवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने सुनावली. शिवाजी लक्ष्मण पार्टे (वेलंग ता.वाई) व नलिनी गणेश खरात (शिरगाव ता. वाई) अशी आरोपींची नावे आहेत.

बारामती शहर पोलीस स्टेशन
निष्काळजीपणा अंगलटपार्टे हे मुख्याध्यापक तर खरात शिक्षिका म्हणून काम करतात. रेनावळे येथील राखीव वनक्षेत्रास 26 फेब्रुवारी रोजी वणवा लागला होता. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम पूर्वक हा वनवा विझवला होता. शिवाजी पार्टे व नीलिमा खरात यांनी गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कचऱ्यातील कागद व पालापाचोळा वाऱ्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला त्यामुळे ही आग वनक्षेत्रामध्ये पसरल्याचे वनाधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे


वन अधिनियमानुसार कारवाई
या आगीत वनक्षेत्रातील 22 हेक्‍टर वनक्षेत्र जळून शासनाचे 11 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते.

आरोपींनी भरला दंड
गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. माळी यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण 10 हजार रुपये दंड न्यायालयात भरला. सरकारच्यावतीने सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.

हेही वाचा-दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच.. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अधिकचा वेळ

Last Updated : Mar 20, 2021, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details