सातारा - महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे तीव्र वळणावर बस उलटून 15 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड-महाबळेश्वरला खासगी बसने आली होती. बसमध्ये 34 प्रवासी होते. गुरुवारी (दि. 31 डिसें.) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासाला असताना घाटात बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटला. खासगी बस क्रमांक (एम एच 14 सी डब्लू 4764) रस्त्यावरच उलटली. चालकाने प्रसंगावधान राखत बस डोंगराच्या बाजूला नेली. अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवित हानी घडली असती.
जखमींवर वाई व पाचगणीतील रुग्णालयात उपचार