महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard Hunting Satara : रानडुकरासाठी लावला फास अन् अडकला बिबट्या; अखेर मृत्यू - Female Leopard Hunting Satara

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आबदारवाडी गावच्या हद्दीत रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृत बिबट्या अंदाजे चार वर्षे वयाचा असून त्याचे सर्व अवयव सुस्थितीत होते. याप्रकरणी वनविभाग शिकार्‍याचा शोध घेत आहे.

Female Leopard Hunting Satara
बिबट्या

By

Published : Apr 23, 2023, 8:38 PM IST

सातारा: जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभाग सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळ गाठले. बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याने तस्करीसाठी त्याची शिकार झाली नसल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळीच मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. कमरेला फासकीचा फास लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे कारण शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानंतर वन अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.


शिकारी बिनधास्त:वन्यजीव कायदा कडक करून देखील शिकारीच्या घटना घडतच आहे. आबदारवाडी गावातील बिबट्याच्या या मृत्यू प्रकरणाने तालुक्यातील शिकार्‍यांना कायद्याचे भय नसल्याचे अधोरेखित झाले आहे. रानडुक्कर, ससे, साळींदराची मोठ्या प्रमाणात शिकार होत आहे. त्यामुळे वन विभागाने रात्रगस्त वाढविण्याची गरज आहे.


वन पाटील संकल्पना कागदावरच:शिकारीच्या घटना रोखण्यासह शिकार्‍यांची माहिती मिळण्यासाठी पोलीस पाटील पदाच्या धर्तीवर वन पाटील ही संकल्पना पुढे आली. या पदावरील व्यक्तीला वनविभागाचे ओळखपत्र आणि कामगिरीच्या मूल्यमापनानुसार मानधन देण्याची ही योजना आहे; परंतु वन पाटील पदाच्या नेमणुकीची कार्यवाहीच झालेली नाही. त्यामुळे ही संकल्पना कागदावरच राहिली आहे.

बिबट्याचा पंजा तुटला: फासकी (सापळा) लावून बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना कराडजवळच्या खोडशी गावात 9 फेब्रुवारी, 2022 रोजी समोर आली होती. बिबट्या फासकीत अडकल्याचे नागरिकांना आढळल्याने बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न फसला. परंतु, फासकीत पाय अडकल्याने बिबट्याच्या पायाचा पंजा तुटला होता.

फासकीत अडकलेला बिबट्या दहा महिन्याचा: बिबट्या लोखंडी फासकीत अडकल्याची माहिती खोडशी गावच्या पोलीस पाटलांनी वनविभागाला कळविली. माहिती मिळताच कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल बी.सी. कदम, ए.पी. सवाखंडे, आर.ए. कुंभार, शितल पाटील, अश्विन पाटील, रमेश जाधवर, यु.एम. पांढरे, एम.एम. जाधव, योगेश बडेकर, शंभूराज माने हे घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे दहा महिन्याच्या बिबट्याचा पाठीमागील डावा पाय लोखंडी फासकीत अडकला होता. बिबट्याला वनविभागाच्या पिंजर्‍यात घेण्यात आले. वराडे गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या रोपवाटीकेत नेऊन बिबट्याच्या पायातील फासकी काढण्यात आली. मात्र, फासकीत अडकल्याने बिबट्याचा पंजा तुटून पायाला गंभीर दुखापत झाली. सध्या बिबट्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा:Kesarkar On Ajit Pawar : अजित पवार युतीत आले तर.... ; दीपक केसरकर यांनी स्पष्टच सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details