महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणंदजवळ रेल्वेच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू - अश्विनी रुग्णालय

लोणंद रेल्वेस्थानकानजीक आश्विनी रुग्णालय येथे रेल्वेगाडीची धडक बसून झालेल्या अपघातात अंदोरी (ता. खंडाळा) येथील पितापुत्राचा जागीच मृत्यू झाला. शैलेश बोडके व रुद्र बोडके, अशी मृतांची नावे आहे. शैलेश बोडके हे धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वीच ते अंदोरी येथे आपल्या घरी आले होते.

म

By

Published : Sep 28, 2021, 7:07 PM IST

सातारा - लोणंद रेल्वेस्थानकानजीक आश्विनी रुग्णालय येथे रेल्वेगाडीची धडक बसून झालेल्या अपघातात अंदोरी (ता. खंडाळा) येथील पितापुत्राचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा रेल्वे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी आले होते गावी

रेल्वे पोलिसांकडून व घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय 28 वर्षे) हे धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची पत्नी मुंबईत पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शैलेश बोडके हे दोन दिवसांपूर्वीच अंदोरी येथे घरी सुटीवर आले होते. दरम्यान, शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह सायंकाळी लोणंद रेल्वे स्थानकांवर गेले. गांधीधाम फेस्टीवल एक्सप्रेस या रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात शैलेश बोडके व त्यांचा एक वर्षाच्या मुलगा रुद्र बोडके यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सहायक पोलीस निरिक्षक व्ही.आर.पाटोळे, पी.एन. भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

अंदोरी गावावर शोककळा

या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रेल्वे पोलिसांनी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात या दोघांचे शवविच्छेदन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईच्या ताब्यात दिले आहेत. रात्री उशीरा अंदोरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत अंदोरी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -प्रियकाराच्या मदतीने बहिणीनेच केली बहिणीची हत्या, कराड येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details