सातारा - सध्या अस्तित्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करून 'ई - नाम' (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या ऑनलाईन व्यवहार पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केले होते. यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. यावरती शेतकरी, व्यापारी वर्गात मोठया प्रमाणावर नाराजी पसरल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी निषेध करत आहेत.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या बरखास्तीवर नाराजी व्यक्त केली हेही वाचा -यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त 24 नोव्हेंबरपासून 16 वे कृषी प्रदर्शन
यावरती शेतकरी व व्यापारी वर्ग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. 'ई - नाम' पद्धत कशी असेल, शेतकरी, आडतदार यांच्यावर कशाप्रकारे प्रभाव पडेल असे प्रश्न निर्माण होत आहेत.
हेही वाचा -खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; कराडकर संतप्त
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची अर्थवाहिनी समजली जाणारी बाजार समिती जर बंद करण्यात आली तर शेतकरी, व्यापारी वर्ग यांच्यातील देवाणघेवाण बंद होईल. वर्गणी माल विकायचा कुठे असे प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारले जात आहेत. सर्वसामान्य माणसाला व शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका देखील बसू शकतो असे देखील शेतकरी बोलत आहेत.