करमाळा (सातारा) - महावितरणच्या गलथान कारभारामुळे करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील शेतकरी बाबुराव दगडू कोडलिंगे यांच्या पोंधवडी उमरड शिवेवर उमरड हद्दीत असलेल्या गट नंबर 314/6 या क्षेत्रातील अकरा महिने सांभाळलेला दोन एकर उस महावितरणच्या डिपीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. याची योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
हेही वाचा -'कृषी विद्यापीठांचा फायदाच नाही, त्यांनी फक्त हजारो एकर जमिनी अडवून ठेवल्या'
महावितरणने पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले असले तरी तलाठी या ठिकाणी फिरकले नाहीत. करमाळा येथील महावितरणचे अभियंता जाधव यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. 'बाबुराव कोडलिंगे यांच्या जळित उसाचा पंचनामा केला असून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वरिष्ठ विभागाकडे अहवाल सादर करणार आहोत,' असे जाधव यांनी सांगितले आहे.