सातारा : पाटण तालुक्यातील शिरळ गावच्या शेतकर्याचा रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू (Rangawa attack Farmer death) झाल्याची घटना समोर आली आहे. हरिबा सुर्यवंशी, असे मृत शेतकर्याचे नाव आहे. गुरे चारण्यासाठी गायरानात गेल्यानंतर समोर आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला (Rangawa attack on farmer) केला. रात्री उशीरापर्यंत ते घरी न आल्यामुळे गायरानात त्यांचा शोध घेत असताना ते मृतावस्थेत आढळून आले. (Farmer found dead)
Farmer Died In Rangava Attack : गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू - Farmer Died In Rangava Attack
पाटण तालुक्यातील शिरळ गावच्या शेतकर्याचा रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू (Rangawa attack Farmer death) झाल्याची घटना समोर आली आहे. हरिबा सुर्यवंशी, असे मृत शेतकर्याचे नाव आहे. गुरे चारण्यासाठी गायरानात गेल्यानंतर समोर आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला (Rangawa attack on farmer) केला. रात्री उशीरापर्यंत ते घरी न आल्यामुळे गायरानात त्यांचा शोध घेत असताना ते मृतावस्थेत आढळून आले. (Farmer found dead)
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला -कोयनानगरनजीकच्या हेळवाकमध्ये दुर्गा उत्सवावेळी चक्क बिबट्या घरात घुसला होता. त्यानंतर आता रानगव्याच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे कोयना अभयारण्याच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आणि उपद्रव वाढत चालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकर्यांना शेतात जाणेही अवघड झाले आहे. बिबट्या, रानगव्यांसारख्या वन्यप्राणी, पशुंकडून धोका वाढला आहे. गुरे चारण्यासाठी गायरानात गेलेल्या शिरळ येथील हरिबा सुर्यवंशी यांना गव्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. वनक्षेत्र पाल तुषार नवले, वनपाल सावडेकर, वनरक्षक कदम यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृताच्या कुटुंबीयांना 15 दिवसात भरपाई -मानव आणि रानगवा समोरासमोर आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी हरिबा सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार येत्या पंधरा दिवसात 20 लाख रुपयांची अर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे.