कराड (सातारा) - पाटण विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. दिवसभरात मतदारसंघातील २३ ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती. नवीन मतदान यंत्रे दिल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. अनेक ठिकाणी सायंकाळी सहानंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा -मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क
पाटण विधानसभा व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी पाटण मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान झाले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर व त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केले. महायुतीचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई यांनी कुटुंबासह मरळी येथे मतदान केले. मतदान यंत्रांमधील बिघाडाचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.