सातारा - महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा आणि रांजणवाडी येथे ३० मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढवून वेळ देण्यात आला आहे. तत्पूर्वी मशीन बंद पडल्यामुळे या केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.
साताऱ्यातील 'या' मतदान केंद्रावर पडली ईव्हीएम मशीन बंद
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील मतदान केंद्रावर ३० मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे.
रांजणवाडी मतदान केंद्र
महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात विविध लोकसभा मतदार संघात निवडणूक पार पडत आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा आणि रांजणवाडी येथे ३० मिनिटे मशीन बंद पडली होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे. आतापर्यंत ५० टक्के मतदान झाले आहे.
Last Updated : Apr 23, 2019, 7:25 PM IST