सातारा - तापामुळे मी सलाईनवर होतो. तरीही महापुराच्या परिस्थितीत मी पूरग्रस्त लोकांना धीर आणि मदतीचा हात दिला. परंतु, आपण ज्यांच्या प्रचारासाठी आलात, ते महापूर परिस्थितीत कुठे होते, असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी शरद पवारांना केला आहे.
शंभूराज म्हणाले, आजारपण कुणाला सांगून येत नाही. महापूराच्यावेळी मला डेंग्यू झाला होता. तापामुळे मी सलाईनवर होतो. तरीही महापुराच्या परिस्थितीत मी पूरग्रस्त लोकांना धीर ॉ दिला. परंतु, आपण ज्यांच्या प्रचारासाठी आलात, ते महापूर परिस्थितीत तालुक्यातच नव्हे, तर देशातही नव्हते. पूरस्थितीवेळी ते कुठे होते, याचे उत्तर प्रथम द्या आणि मगच त्यांच्यासाठी मते मागा. देसाई यांनी विरोधकांच्या पाटण या बालेकिल्ल्यात विराट शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी झालेल्या सांगता सभेत ते बोलत होते.