साताराबंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असे खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाबळेश्वरमधील तापोळा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले. मुंबई कर्मभूमी तर सातारा जन्मभूमी मुंबई माझी कर्मभूमी असली तरी सातारा माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेले स्वागत अधिक आनंददायी असते. आमचे सरकार हे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार ( Shiv Sena BJP coalition government ) असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) आणि मी हे सरकार आणखी पुढे नेत आहोत. माझ्यासारखा सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरात जोरदार स्वागत झालं. आपला मुख्यमंत्री झाल्याचा गाव खेड्यातील लोकांना आनंद झाला. मी गोरगरीबांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
तीन दिवसात खाते वाटपयेत्या १५ ऑगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करू, असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून लवकरच या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आले जन्मगावीमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील तापोळा-दरे या आपल्या मूळ गावी आले होते. यावेळी तापोळ्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तापोळ्यात पोहचताच सर्वात आधी पद्मावती देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर भेटायला गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले. मी म्हणजेच सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला आहे. त्याचा सर्वांना आनंद झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.