महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराड-विटा मार्गावर एसटीच्या इंजिनला आग... तर, सुर्ली घाटात एसटी उलटली - satara ST accident news

धावत्या एसटीच्या इंजिनाला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी कराड-विटा मार्गावर खंबाळे-सुर्ली या गावादरम्यान घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवासी बचावले. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी कराड आगाराची बस रस्त्यातच उलटल्याने चालक जखमी झाला. या अपघातामुळे कराड-विटा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती.

satara ST accident news
कराड-विटा मार्गावर एसटीच्या इंजिनला आग... तर, सुर्ली घाटात एसटी उलटली

By

Published : Dec 17, 2020, 5:12 PM IST

सातारा - धावत्या एसटीच्या इंजिनाला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी कराड-विटा मार्गावर खंबाळे-सुर्ली या गावादरम्यान घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवासी बचावले. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी कराड आगाराची बस रस्त्यातच उलटल्याने चालक जखमी झाला. या अपघातामुळे कराड-विटा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती.

कराड-विटा मार्गावर एसटीच्या इंजिनला आग... तर, सुर्ली घाटात एसटी उलटली

कराडहून विट्याकडे निघालेल्या एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊन आग लागली. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याकडेला थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. घटनास्थळी रस्त्याचे काम सुरू होते. कामावरील काँक्रीट मिक्सरमधील पाण्याचे फवारे मारून ही आग विझविण्यात आली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याने प्रवाशांनी चालकाचे कौतुक केले.

याच मार्गावर बुधवारी दुपारी कराड आगाराच्याच एका बसला अपघात झाला. कराड-विटा मार्गावर सुर्ली गावच्या हद्दीत एक एसटी बस पलटी झाली. या अपघातात एसटी चालक किरकोळ जखमी झाला. तर प्रवासी बचावले. भर रस्त्यात एसटी आडवी झाल्यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प होती. अखेर रात्री उशीरा क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त एसटी बस रस्त्यातून बाजूला काढण्यात आल्यानंतर परिस्थिती पूर्ववत करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details