महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे पाडली, प्रतापगडाला छावणीचे स्वरूप - Shiv Pratap Din

प्रशासनाने पहाटे धडक कारवाई करत प्रतापगडावरील अफजलखान कबरीच्या ( Afzal Khans grave ) परिसरातील अतिक्रमणे पाडण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असून प्रतापगडाला छावणीचे स्वरूप ( Encroachments in the vicinity ) आले आहे. अत्यंत गोपनीयता बाळगत ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रतापगडाला छावणीचे स्वरूप
Afzal Khans grave

By

Published : Nov 10, 2022, 8:57 AM IST

Updated : Nov 10, 2022, 1:04 PM IST

सातारा : प्रशासनाने पहाटे धडक कारवाई करत प्रतापगडावरील अफजलखान कबरीच्या ( Afzal Khans grave ) परिसरातील अतिक्रमणे पाडण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असून प्रतापगडाला छावणीचे स्वरूप ( Encroachments in the vicinity ) आले आहे. अत्यंत गोपनीयता बाळगत ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रतापगडाला छावणीचे स्वरूप

363 वा शिवप्रताप दिन : 10 नोव्हेंबर 1659 दिवशी घडलेली ही घटना शिवप्रेमी 'शिवप्रताप दिन’ ( Shiv Pratap Din) म्हणून साजरा करतात. अफजल खानाचा वध करताना शिवरायांनी दाखवलेले शौर्य जितके अभिमानास्पद (Proud bravery) आहे तितकीच वाखाण्याजोगी आहे त्यांची दूरदुष्टी. यंदा शिवभक्त 363 वा शिवप्रताप दिन (363rd Shiv Pratap Day) साजरा करणार आहे.

एका शामियान्यात भेटले :पहाटे-पहाटे शिवरायांनी नक्कीच आई तुळजा भवानीची मनोभावे प्रार्थना केली असणार. ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे आणि अफझल खान एका शामियान्यात भेटले. राजांचा वकील 'पंताजी पंडित' तर खानाचा वकील 'कृष्णाजी भास्कर' यांच्याशिवाय दोघांसोबत 10-10 अंगरक्षक होते. गडावरून निघताना राजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती.

अफजल खानाचा कोथळा काढला: प्रतापगडावर अफजल खानाने शिवरायांना बोलावून जिवे मारण्याचा कट रचला होता. छत्रपती शिवाजी महाराज चतुर आणि दूरदुष्टी असणारे प्रशासक होते. त्यांनी अफजल खानाच्या मनातील हा डाव त्याच्या भेटीपूर्वीच ओळखला होता. त्यानुसार अंगात चिलखत आणि हातात वाघनखे घेऊन ते भेटीला पोहचले होते. अपेक्षेप्रमाणे जेव्हा अफजल खानाने शिवरायांना मिठीत दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रतिकार करत आपल्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला.पालखीच्या मिरवणुकीचेही आयोजन: कोरोना संकटानंतर आता जनजीवन पुन्हा निर्बंधमुक्त झाले असल्याने प्रतापगड पुन्हा गजबजण्याची शक्यता आहे. प्रतापगडावर देवीची पूजा केली जाते. ध्वजारोहण करून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, पुष्पहार अर्पण केला जातो. याशिवाय महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचेही आयोजन गडावर केले जाते.

सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त :प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर सातारा जिल्हा प्रशासनाने अफजलखान वध दिनी बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने पहाटे ही कारवाई केली असून सध्या प्रतापगड परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. कबर परिसराकडे जाण्यास मनाई करण्यात आली प्रतापगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

सातारा प्रशासनाची रात्रीपासूनच तयारी : अफजल खान कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपासून जय्यत तयारी केली होती. चार जिल्ह्यातील 1600 पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. हे पोलीस रात्रीच प्रतापगड परिसरात दाखल झाले. तसेच अवजड यंत्रसामग्री प्रतापगडाकडे जात होती. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत देखील पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे प्रशासनाकडून कसल्या तरी हालचाली सुरू असल्याची जाणीव स्थानिकांना झाली होती. मात्र, अत्यंत गोपनीयता बाळगत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहाटे प्रशासनाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे पाडली.

शिंदे-फडणवीस सरकारचा सर्जिकल स्ट्राईक :छ. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 म्हणजेच आजच्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. या ऐतिहासिक घटनेला आज 363 वर्षे पूर्ण होत असतानाच जिल्हा प्रशासनाने अफजल खान कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. सध्या कबर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात हिंदुत्ववादी संघटना सातत्याने आवाज उठवत होत्या. उच्च न्यायालयाने देखील अनधिकृत बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करताना शासनाने वधदिनाचा मुहूर्त साधत कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिवप्रताप दिनासाठी हजारो शिवभक्त दाखल : अफजल खान वधाचा दिवस हा शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुक्यामध्ये दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात जाऊ दिले नाही. 144 कलम लागू केल्यामुळे प्रतापगड परिसरात तणापूर्ण वातावरण होते. मात्र, पहाटे अनधिकृत बांधकामावर कारवाई झाल्याने प्रशासनाने जमावबंदी का लागू केली, याचा उलगडा झाला. मागील काही वर्षात अतिक्रमणावरून वाद-प्रतिवाद सुरू होता. त्यामुळे प्रतापगडाच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. अनेकदा आंदोलनेही झाली होती. त्यामुळे कबरीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त असतो. म्हणूनच प्रशासनाने या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गोपनीयता बाळगून अतिक्रमणांवर पहाटेच्या सुमारास कारवाई केली

Last Updated : Nov 10, 2022, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details