सातारा - जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळत चालल्याचे चित्र दिसत आहे. मात्र याच साताऱ्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चालवलेल्या एका मोहिमेची सगळीकडेच चर्चा होत आहे.
कार्यकर्त्यांनी भावनिक साद
"साहेब कोणी कुठंही जाऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत.."
"होय मी साहेबांसोबत आहे"
" साहेब आम्ही सोबत आहोत"
अशा प्रकारच्या कॅप्शन खाली स्वतःचा प्रोफाईल फोटो बनवत, येथील कार्यकर्त्यांनी एक भावनीक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, माण खटावचे नेते शेखर गोरे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला ढासळत चालला आहे, असे दिसत आहे. यावर सोशल मीडियावर सामान्य कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांना भावनिक हाक दिली आहे.